ACTIZEN Activity 10

Pride of Goa

Type of Activity – School Level Activity

Introduction

Goa is a union territory – it is called the Rome of the East. This region was under the control of numerous rulers including French and British ones. Therefore, Goa is a land of unique culture and interesting heritage with varying forms of entertainment and influences from western culture.

In today’s session, students will find their own reasons to be proud of Goa. They will research deeply on the various aspects/areas of Goan culture, art, tradition, food, and festivals and find out the reasons for being proud of these aspects.

Expected Outcomes

 1. Students will be able to think about the uniqueness of Goa.
 2. Students will acquire knowledge about the diversity in Goa.
 3. Students will become aware of different areas where they should feel proud as a Goan.
 4. Students will be able to creatively display their own feelings about Goa.

Start the class with a brief introduction to the activity. You can say that today we are going to discuss and discover various aspects or shades of Goa that we think is unique and we should feel proud about as Goans. Together, we will identify these areas and research more about the same.

 1. Ask students to think about the 1 best thing about Goa for a minute and what they like about the same. (For eg, music, food, art, dance, architecture, heritage, festivals, etc.)
 2. Ask them to write their answers in the chatbox if you are taking online sessions. In case of physical classes, allow them to speak and the teacher can write their responses on the Blackboard/Whiteboard.
 3. Read the responses aloud in class, highlight/underline the common answers.
 4. Make a list of things, discussed by students like travel, festivals, food, language, culture, art, etc.
 5. Based on the common responses, divide the class into groups. If the responses are more than 10-15, make a group of 2-3 students.
 6. Assign the common themes or areas to the groups and ask them to do research about the same. Give time till the next class.

For example, if Group 1 is allotted the area of festivals, then they need to research the most popular festivals in Goa – the name of the festivals, time of celebration, the history behind the festival, unique features of the festival.

 

If Group 2 is assigned the topic of food, they need to research the famous foods of Goa, which part of Goa it belongs to, recipe, nutritional value, etc.

 1. Ask them to research and prepare a small booklet (10-15 pages maximum) on the theme that was selected. They can use photos, articles, newspaper cuttings to make their booklet more attractive.
 2. Ask them to upload the same along with the reflection sheet before the next class.

Related Articles

Responses

 1. Information collected by the students.

  मुळगावचा पावणेर उत्सव

  “माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्या मधुनी घट फुटती दुधाचे……
  बा.भ.बोरकरांच्या नादमय आणि विलोभनीय अशा या कवितेत गोव्याचे सचित्र वर्णन येते. गोव्याचा निसर्ग इथली संस्कृती, इथली माणसं, त्यांचं सामाजिक जीवन पाहता गोवा हे देवाला पडलेले एक सुंदर स्वप्न होय. परशुराम भूमीच्या या कोकणात प्रत्येक गावाची वेगळी अशी वोळख आहे.देव देवस्की इथला ग्राम – ग्रामीण पणा, बारा पाचाचे देवस्थान आणि इथला निसर्ग. इथल्या नद्या, इथलं पाणी,इथल्या माणसांचा साधा सरळ आणि सुशेगात स्वभाव ही आभूषणे घालून तो आपले जीवन कंठस्थ करत असतो.
  गोव्याचा इतिहास आणि संस्कृती पाहिली तर इथल्या लोकांवर अनेक आक्रमण कर्त्यांनी राज्य केले आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला. गोवेकरांची ओळख मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला. मंदिरे मोडली गेली, धर्मग्रंथ जाळले गेले. जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आले. जुलूम अत्याचाराने माजलेल्या पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावलं परंतु आपली संस्कृती परंपरा सण-उत्सव विसरले नाहीत आणि त्याचा त्यागही केला नाही.
  आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही परंपरा जपण्याचे कार्य ग्रामीण भागातील लोक करतात. गोवा भौगोलिक दृष्ट्या आकाराने जरी लहान असला तरी संस्कृती दुसऱ्या मात्र कुठेही कमी पडला नाही किंवा पडणार नाही. काणकोण ते पेडणे पर्यंत आपण प्रत्येक गावाचे नाव जरी घेतलं तर त्यां नावाचा अर्थ लावताना आपल्याला बराच अभ्यास करावा लागतो. आपल्या भाषेतील गोडवा त्यातील संगीत नादब्रम्ह आणि काव्य आपण नकळत गुणगुणतो.
  ढोल, ताशे, समेळ, घुमट, ताळ हा तर गोवे कराचा प्राण आहे. एक वेळ गोवेकर उपाशी राहिल परंतु संगीत, नाटक याच्या शिवाय जगणार नाही आणि म्हणूनच आज सुद्धा अनेक सत्तांतरे पलटली तरीही त्यांनी आपली संस्कृती सांभाळली आहे.
  जुन्या काळात निसर्गरम्य अशा या गोव्यात शेती व गुरे सांभाळणे हा प्रमुख व्यवसाय असायचा.संपूर्ण दिवस कष्ट करून घरी परतला की त्याला थोडी का होईना परंतु मनोरंजनाची गरज भासायची. आणि ह्या गरजेतूनच उत्सव सण याचा जन्म झाला. भरपूर काबाडकष्ट केल्यानंतर व संस्कृतीचा एक भाग म्हणून जे पीक शेतात यायचं चा उपयोग करून सण, उत्सव साजरे करण्यात यायचे.
  आज आपण अशाच मुळगाव या गावाची सांस्कृतिक धरोहर असलेला “पावणेर” या उत्सवाची माहिती जाणून घेऊया. मुळगाव या गावात मूळमाया सातेरी व ग्रामदेवता केळबाई व पंचायतन देवस्थान हे प्रमुख देवता मानली जाते.
  गोव्याचा इतिहास सात बहिणी व त्यांचा एक भाऊ यांचा परिचय नसलेला असा एकही माणूस सापडणार नाही. या सात बहिणीपैकी केळबाई ही एक,ही बहिण येऊन मुळगावला स्थायिक झाल्याचे आपण पाहतोय. या देवीचा पेठेचा जत्रोत्सव व कौलोत्सव हा उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो, घोडेमोडणी काला, दिवजांची अमावश्या, पावणेर असे लहान-मोठे अनेक उत्सव साजरे केले जातात.
  तर आज आपण ” पावणेर ” उत्सवाची महती जाणून घेवू.
  या उत्सवाची माहिती जाणून घेण्याअगोदर ग्रामव्यवस्था समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुळगाव या छोट्याशा गावात आपल्याला अनेक स्थलांतरित मंदिरे दिसतात. जुलमी आणि अत्याचारी पोर्तुगीज राजवटीतून आपल्या परमेश्वराला,आराध्यदैवताला सुरक्षित ठेवण्यासाठी हे स्थलांतर केलेले आपल्याला आढळून येते. बाटाबाटीच्या काळाचे पुरावे इथे भेटतात. मुळगाव हा गाव लोकवस्ती मानाने खूपच कमी संख्या असली तरीही इथे पुरातन ग्रामीण व्यवस्था आपल्याला आढळते. वर्ण व्यवस्थेनुसार येथे सर्व जातींची व्यवस्था आपल्याला आढळते. गाड, परब, राऊत, चारी (मेस्त) सोरोप (सराफ) वझरकर व इतर रयतेची कुटुंब सापडतात. गाड, परब, राऊत ही प्रमुख गावकर मानकरी आहेत. या कुटुंबांना दहाजण असे म्हटले जाते.
  दसऱ्या दिवशी श्री रवळनाथ देव व भूतनाथ देव यांची तरंगे रवळनाथ मंदिरात सजवून सीमोल्लंघन केल्यानंतर श्रीदेवी केळबाईच्या मंदिरात आणून ठेवतात. शेतीवाडीचे काम संपल्यानंतर गावकऱ्यांना फुरसत मिळेल असा दिवस ठरवून ही तरंगे म्हणजेच ‘देव’ गावात प्रत्येक यजमान गावकऱ्यांच्या घरी एक रात्र राहायला जाऊन महाप्रसाद नैवेद्य करता.असे तीन दिवसानंतर या कार्यक्रमाची सांगता होते. तिथं गावातील सर्वांना देव भूतनाथ रवळनाथ आशीर्वाद देतो.
  पावणेर उत्सवाची विशेषता
  ज्या दिवशी हा ‘देव’ मानकरी गावकर यांच्या घरी येतो. त्याला ‘देव सोडवणे’ असेही म्हणतात. गाड, परब, राऊत व (मेस्त)चारी. यांच्यापैकी परब व चारी या घराण्यातील भूतनाथ व रवळनाथ यांची तरंगे घेतात.
  या उत्सवाची तयारी अगोदर चार दिवस केली जाते.गावकरी अगोदर कुटुंबातील सर्वांकडून कुळीत भाजून घेणे, माटव-मंडप घालणे, सजावट करणे ही सर्व कामे करतात.एका मे सगळी कुटुंबातील मंडळी स्वच्छेने व आनंदाने करताना दिसून येतात आज सुद्धा आधुनिक युगात जेव्हा जेवण बाहेरून मागवला जाते, इथे मात्र सर्व कामे घरगुती पद्धतीने केली जातात.
  रात्रीचे सुमारे आठ वाजता सर्व गावकरी एकत्र येऊन श्री देवी केळबाई च्या मंदिरातून वाजत गाजत देव पहिल्या रात्रीला गाड मानकरी च्या घरी जातो तिथे यथायोग्य सुहासिनी च्या हाताने देवाचे स्वागत केले जाते. गोव्यातील पद्धतीप्रमाणे देवाचे पाय धुऊन त्यांची ओवाळणी केली जाते व मोठ्या सन्मानाने त्यांना घरात आणले जाते. देवघरात आल्यानंतर सर्वप्रथम तरंगे दोर खांबाला बांधून यथायोग्य पूजाअर्चा झाल्यानंतर बागडा हा विशेष प्रकारचा नाच सादर केला जातो. यावेळी पारंपारिक घुमट,समेळ, कासाळेच्या वाद्यवर गीते गायली जातात. व रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी श्रींची पूजा करून दुपारी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ज्या मानकरीच्या घरी हे देव आलेले असतात त्या सर्व कुटुंबातील माणसांना दुपारी महाप्रसाद म्हणून जेवण देतात. याच दिवशी रात्री संपूर्ण गावाला महाप्रसाद नैवेद्य दिला जातो. उकडे (शित) म्हणजेच भात हा प्रसाद तयार करण्यासाठी ज्या मानकरी गावकरी आहे त्याच्या घरातील कुटुंबातील व गावातील सर्व दायजी गोत्री दुपारचा महाप्रसाद व रात्रीचा महाप्रसाद तयार करायला येतात. महाप्रसादानंतरगोमहाप्रसादानंतर सुमारे रात्री नऊ वाजता कौल देवाचा आशीर्वाद देऊन श्रींची मिरवणूक दुसऱ्या मानकर यांच्या घरी जाते. असे गाड, परब, राऊत व चारी यांच्या घरी एक रात्रीला राहून दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थांना देव रवळनाथाच्या प्रांगणात कौल प्रसाद दिला जातो. याला “कवळास” असे म्हणतात. इथे भूतनाथ व रवळनाथ हे देव बाहेरची किंवा आतील पीडा असेल भूत प्रेत संबंध आधी बाधा झालेल्या माणसांना इथे ठीक केले जातात. अशा तऱ्हेने या पावनेर उत्सवाची सांगता होते.
  महाप्रसाद व वडे
  रात्रीच्या महाप्रसादाला गावातील सर्व मंडळी उपस्थित असतात यासाठी ज्या मानकर यांच्या घरी श्री विराजमान असतात त्या कुटुंबातील गावातील सर्व स्त्री व पुरुष एकत्र येऊन या महाप्रसादाची तयारी करतात. जुन्या काळी ज्योती भात तांदूळ व कुळीद कुळदाची पिठी हा महाप्रसाद म्हणून दिला जात असे गावातील जेवढे घर आहेत व त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या नावाने हा महाप्रसाद दिला जायचा (पष्णी) म्हणजे हाताचा मोठा पंजा मारून शिजवलेले भात (शित), व घरातील माणसाप्रमाणे पिठी दिली जात असे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावातील अलीकडे पलीकडे सर्व लोक येत असे. या महाप्रसादासाठी सुमारे शंभर किलो उकडे तांदूळ व सुमारे 80 ते 90 किलो कोळीद लागत असे. ही परंपरा कधी सुरू झाली हे मात्र सांगता येणे कठीण आहे. तरी आजतागायत ही परंपरा अशीच चालू आहे.
  वडे
  पावणेर या कार्यक्रमाची आणखी एक विशेषता म्हणजे वडे होय.
  तांदळाचे पीठ व उडीद डाळीचे पीठ सुमारे दहा किलो दळून त्याचे वडे केले जातात या वड्यांचे विशेषता म्हणजे छोटे-छोटे नखा एवढे हे वडे असतात. हे तयार भाजायला सुमारे चार-पाच तास लागतात मानकरी घराण्यातील सर्व बायका एकत्र येऊन मोठ्या हौसेने देव कार्यात सहभागी होतात.विशेष म्हणजे वडे हा प्रकार वर्षातून एकदाच केला जातो घरात उत्सवासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना प्रसाद म्हणून वडे दिले जातात. एवढे घ्यायला झुंबड लागते हे काही सांगायला आणखी विशेष नको.इथे काळाशी लागते ते वाटणाऱ्यांची कुणाला किती द्यायचे सांभाळून द्यायचे ही त्याची जबाबदारी असल्याने हा कुटुंबातील प्रमुख पुरुष असलेला माणूस हे एवढे वाटत असतो.
  बागडे
  संपूर्ण गोव्यातून एकाच गावात अशा प्रकारचा हा नाच आपल्याला बघायला मिळतो या नाचात विशिष्ट प्रकारे पाय संगीताच्या तालावर नाचवतात उजवा पाय उचलून पुढे ठेवतानाच डावा पाय उचलून पाठीमागे पायाला लावावा लागतो. हे करताना हातातील पंचारतिची वात मानता कामा नये. तसेच डाव्या हातात घेतलेली घाट (घंटा) थांबता कामा नये. इथे नाचण्याची व वाजवण्याची दोघांचीही कसरत लागलेली असते जो जास्त काळ असेल त्याला विजयश्री मानले जायचे.

  गाड मानकरी बागडे घालताना म्हणायचे गीत
  प्रथम नमन करू देवा गणेशा एक भावे मन भावे करीन तुझी सेवा ll२ll
  परब मानकरी बागडे घालताना म्हणावयाचे गीत व्हायचे गीतचे
  चारी (मेस्त)

  परब मानकरी बागडे घालताना म्हणायचे गीत.
  देवळाभोवती फुलविला चाफा
  भरविला गोफबाई सातेरी आईचा ll२ll

  राऊत मानकरी बागडे घालताना म्हणावयाचे गीत

  मागील दारच्या पिंपळाक सुपारीएवढी पाना
  माय गेल्या सोनार भाटान सुनेचे फुकलो कान ll२

  चारी मेस्त (गीत)
  आयतुलाच्या कोयतुला शेमलिक घालू थोरू
  माय सुनेचे झगडे झाले हांव किदे करू

  सराफ (सोरोप)
  आंब्या तुजी आमर फळे
  लेकुरवाळे खिळूंक गेले फुगड्या फुबाई बाये शेवतू माजे तू ll२ll

Disclaimer


The Desh Apnayen Sahayog Foundation website has been translated for your convenience using translation software powered by Google Translate. Reasonable efforts have been made to provide an accurate translation. However, no automated translation is perfect or intended to replace human translators. Translations are provided as a service to the Desh Apnayen Sahayog Foundation website users and are provided "as is." No warranty of any kind, either expressed or implied, is made as to the accuracy, reliability, or correctness of any translations made from the English Language into any other language. Some content (such as images, videos, Flash, etc.) may need to be accurately translated due to the limitations of the translation software.

This will close in 5 seconds

You cannot copy content of this page